34 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeसोलापूरशेताच्या वाटणीच्या कारणावरून पित्याचा खून केल्याप्रकरणी पुत्र निर्दोष

शेताच्या वाटणीच्या कारणावरून पित्याचा खून केल्याप्रकरणी पुत्र निर्दोष

सोलापूर : पंडित जेटप्पा गावडे वय:- 55, रा:- वाघोली ता मोहोळ जि सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी मुलगा सर्जेराव पंडित गावडे वय:- ,रा:-वाघोली ता मोहोळ जि सोलापूर याच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी सत्र न्यायाधीश आय.ए.शेख यांनी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

यात हकीकत अशी की, सर्जेराव व त्याचा भाऊ शाहू यांच्यात शेतीच्या वाटण्या झालेल्या परंतु आरोपी सर्जेराव यास वाटण्या पसंत न्हवत्या, दि:-23/4/2022 रोजी शेतीच्या वाटणीच्या कारणावरून आरोपी सर्जेराव याने वडील पंडित आणि मध्ये पडणारी आई निलाबाई याना काठीने मारहाण केली. त्यावेळेस आरडाओरडा झाल्यावर लोकांनी जखमी अवस्थेत असलेले पंडित व निलाबाई याना उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले होते.

उपचारादरम्यान आरोपीचे वडील पंडित हा मयत झाला. अशा आशयाची फिर्याद शिवाजी जेटप्पा गावडे याने कामती पोलीस ठाण्यात दिली होती.त्यावरून सर्जेराव यास अटक करून दोषारोप पत्रक दाखल केले होते. खटल्यात सरकार पक्षातर्फे एकंदर 7 साक्षीदार तपासण्यात आले होते. खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस ॲड मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तीवादात साक्षीदारांच्या जबाब आतील विसंगती न्यायालयाचे निदर्शनास आणून दिल्या त्यावरून न्यायाधीशांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली. यात आरोपीतर्फे ऍड मिलिंद थोबडे, ऍड विनोद सूर्यवंशी, ऍड दत्ता गुंड तर सरकारतर्फे ऍड जी.आय.रामपूरे यांनी काम पाहिले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR