Homeलातूरआमदार अमित देशमुख व माजी आमदार धिरज देशमुख यांच्याकडून विजयी उमेदवारांचे अभिनंदन

आमदार अमित देशमुख व माजी आमदार धिरज देशमुख यांच्याकडून विजयी उमेदवारांचे अभिनंदन

लातूर : प्रतिनिधी
माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार धिरज विलासराव देशमुख व विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी दि. ९ फेब्रुवारी रोजी बाभळगाव निवासस्थानी लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीतील काँग्रेस आघाडीच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या,तसेच काँग्रेस महाविकास आघाडीला मतदान करून विजयी केल्याबद्दल मतदारांचे आभारही मानले.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, माजी आमदार धीरज विलासराव देशमुख आणि विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी आर्वी जिल्हा परिषद गटातील काँग्रेस आघाडीच्या उमेदवार राजश्री धनंजय देशमुख व आर्वी पंचायत समिती गणातील काँग्रेस आघाडीच्या उमेदवार तनुजा बापू चव्हाण,महापूर पंचायत समिती गणातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार श्रीकांत माणिक बैले, हरंगुळ बु, काटगाव,  तांदुळजा, पाखरसांगवी, निवळी, महाराणाप्रताप नगर, साकोळ, लांबोटा, दापका, औराद शहाजनी, कामखेडा, एकुर्गा, जिल्हा परिषद गटातील काँग्रेस आघाडीचे विजयी उमेदवार व हरंगुळ बु, हरंगुळ खु,गातेगाव,तांदुळजा,गाधवड निवळी, चिंचोली (ब), महाराणाप्रताप नगर, बाभळगाव, कामखेडा, मोटेगाव, एकुर्गा, अंकोली,औराद शहाजनी, पाखरसांगवी, गंगापूर,बोरसुरी पंचायत समिती गणातील काँग्रेस आघाडीचे विजयी उमेदवार यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, माजी महापौर अ‍ॅड. दीपक सुळ, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोक काळे, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, रेणा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रवीण पाटील, माजी चेअरमन सर्जेराव मोरे, श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सचिन पाटील, माजी व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, बालाप्रसाद बिदादा, गणेश एस. आर. देशमुख, विष्णुदास धायगुडे, धनंजय देशमुख, बापू चव्हाण, पंडित ढमाले, तात्यासाहेब देशमुख, अण्णासाहेब देशमुख, तानाजी फुटाणे, रमेश थोरमोटे, साहेबराव देशमुख,  रामदास पवार, रामेश्वर धुमाळ,  राम चामे, गोविंद सोदले, सुबुद्दीन शेख, महेश गायकवाड, ज्ञानेश्वर चौधरी, पप्पू होळे, विजयकुमार धुमाळ, रमेश माने, विठ्ठल जाधव, रमेश वसाळे, राहुल चव्हाण, हरून शेख, सुभाष घोडके, राजकुमार पाटील, शिवाजी देशमुख, शिवाजी जाधव, कल्याण सूर्यवंशी, अंगद पाटील, गोविंद देशमुख, व्यंकटेश पुरी, माधव गंभीरे, राम स्वामी, अविनाश देशमुख, संजय ओव्हाळ, उमाकांत मस्के, श्रीशेल गडगडे, प्रताप पाटील, बादल शेख, संगीता पतंगे, राजकुमार पवार, गणपत भाडोळे, गोपाळ थडकर, हनमंत पवार, अभय चव्हाण, सुधीर गोजमगुंडे, पप्पू देशमुख, दत्ता  शिंदे, गोविंद बोराडे, वीरसेन भोसले, कैलास पाटील, अनंत बारबोले, मदन भिसे, विकास कदम, भीमाशंकर झुंजारे, श्याम बरुरे, बालाजी कैले, प्रवीण सूर्यवंशी, शिवानंद पाटील, सूर्यकांत पाटील, सूर्यकांत सुडे,आनंद पवार,रामचंद्र सुडे, नरेश पवार, अक्षय बनसोडे, आबासाहेब पाटील उजेडकर, अंबादास जाधव, महेश देशमुख, लक्ष्मण मोरे, सचिन सूर्यवंशी, सुनिता अरळीकर, चंद्रकांत टेकाळे, गुरुनाथ गवळी, श्रीनिवास शेळके, युनुस शेख, अबू  मणियार आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR