34 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeसोलापूरकोल्ड्रिंक्स उधार न दिल्यानं दुकानदारावर प्राणघातक हल्ला , आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कोल्ड्रिंक्स उधार न दिल्यानं दुकानदारावर प्राणघातक हल्ला , आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर : किराणा दुकानातील कोल्ड्रिंक्स उधार न दिल्याने चिडून आठ जणांसह जमावाने दुकानदाराला रॉडनं, दगडाने बेदम मारहाण करून प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना विष्णूनगर येथे घडली. या प्रकरणी दशरथ रामदास साई (वय- ५४, पोशम्मा मंदिर, विष्णूनगर, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

आठ जणांसह अन्य चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. सलमान पटेल, सद्दाम पटेल, शाहरुख पटेल, बाबर पटेल, चिकू पटेल, मुमताज शेख, तिचा पती, रेहान शेख अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत.

फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादीचे विष्णूनगर येथील पोशम्मा मंदिराजवळ किरणा दुकान आहे. नमूद लोक तेथे आले. त्यांनी कोल्ड्रिंक्स उधार मागितले.फिर्यादीने त्यास नकार दिला. यावर चिडून सर्वांनी मिळून ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड, दगडाने, लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक साळुंखे तपास करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR