28.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeसोलापूरवैद्य मुकुंद लिमये यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

वैद्य मुकुंद लिमये यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

सोलापूर—ॲक्युप्रेशर अँड न्युट्रिशन अकॅडमी मलेशिया यांच्यावतीने वैद्य मुकुंद लिमये यांना राष्ट्रीय पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा बागल यांच्याहस्ते पुणे येथील हॉटेल माधव इंटरनॅशनल येथे प्रदान करण्यात आला. यावेळी भारतातील अनेक नामवंत डॉक्टर उपस्थित होते .महाराष्ट्रातील लिमये निसर्गोपचार केंद्र खूपच वाखाणण्याजोगे आहे असे असे गौरव उद्गार काढत डॉक्टर अजित बागमार यांनी सांगितले की लिमये निसर्गोपचाराचे कार्य विना औषध उपचार पद्धतीमध्ये त्यांनी एक स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेला आहे

तसेच अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी यांना ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चर कपिंग मसाज कलर थेरपी मॅग्नेट थेरपी याचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करत आहेत हे कार्य मोठे आहे यावेळी स्वतः वैद्य मुकुंद लिमये यांनी ॲक्युप्रेशर एक्यूपंक्चर कपिंग मसाज कलर थेरीपी मॅग्नेट थेरीपी म्युझिक थेरेपी मडथेरेपी वॉटर थेरपी या सगळ्यात थेरपी चा वापर करून ते विना औषधोपचार पद्धतीने अनेक दुर्धर अशा आजारातून अनेक लोकांची वेदनेतून सुटका करत आहेत असे सांगीतले.यावेळी संयोजक डॉ अजीत बागमार यांनीही लिमये निसर्गोपचार केंद्राच्या कार्याबद्दल गौरवोदगार काढले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR