38.7 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeलातूरअहमदपूर स्वीप कलापथकाचे प्रशासनाकडून कौतुक

अहमदपूर स्वीप कलापथकाचे प्रशासनाकडून कौतुक

अहमदपूर : प्रतिनिधी
लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अहमदपूर- चाकूर विधानसभा मतदारसंघात स्वीप कलापथकाने नाविन्यपूर्ण उपक्रमातून ४० दिवसात ६० गावात जाऊन मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देऊन मतदार जनजागृती केल्याबद्दल जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकूर यांनी अहमदपूर स्वीप पथकाचे मनापासून कौतुक केले. यावेळी अहमदपूर स्वीप पथकातील उपक्रमाबद्दल माहिती घेऊन चर्चा करण्यात आली.स्वीपचे पथक प्रमुख महादेव खळुरे यांनी माहिती सांगत असताना मागील दिड महिन्यापासून पथकातील सर्व सदस्य सकाळी ७ ते सायंकाळी १०
वाजेपर्यंत या राष्ट्रीय कार्यात स्वयंस्फर्तपणे मतदार जनजागृती करीत आहेत.
जवळजवळ १५ मार्चपासून अहमदपूर चाकूर मतदार संघातभारत निवडणूक आयोगाच्या प्राप्त सुचनेनुसार चुनावी पाठशाला, घोषवाक्य लेखन, चित्र रंगभरण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पथनाट्यातून जनजागृती, निबंध स्पर्धा, मतदार प्रतिज्ञा, संकल्प पत्र, शाळा महाविद्यालय जनजागृती, मतदार जनजागृती रॅली, गाथा ंिदंडी, पारायण, भजनी मंडळ यातून जनजागृती, सेल्फी पाँईंट, गुडी पाडवा, मतदान वाढवा, प्रबोधनपर भारुड, गोंधळ, पोवाडा, लावणी या लोकगीतातून जनजागृती अशा नाविन्यपूर्ण उपक्रमातून ६० गावात जाऊन तलाठी, ग्रामसेवकांची मदत घेऊन  सर्व सदस्यांनी मतदार जनजागृतीचे कार्य पार पाडले आहे अशी माहिती दिली.
     स्वीप पथकाच्या वतीने पथकातील उपक्रमशील कलावंत संगीतअलंकार शिवकुमार गुळवे, तबला विशारद मोहन तेलंगे, प्रवचनकार नागनाथ स्वामी, संगीत विशारद श्रीमती अर्चना माने, बसवेश्वर थोटे,प्रमोद हुडगे, धनंजय नाकाडे,पुरुषोत्तम काळे यांच्या सहकार्याने ६० गावात  मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात आली आहे. यापुढे २० गावात जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR