35 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeलातूरकडब्याचे दर वाढल्याने पशुपालक, शेतकरी चिंतेत

कडब्याचे दर वाढल्याने पशुपालक, शेतकरी चिंतेत

उदगीर : प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये ऊस लागवडीचे प्रमाण वाढल्याने रब्बी ज्वारी पेरणीचे क्षेत्र कमी झाले आहे. यामुळे जवारीचा कडबा २५ ते ३५ रुपये प्रति पेंडी झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत. उदगीर तालुक्यात शेती बरोबर जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करणा-या शेतक-यांना कडबा मिळविण्यासाठी ग्रामीण भागातील वाडी , तांडे, गावोगावी फिरावे लागत आहे. दुधाची वाढती मागणी व वाढते दर पाहून तीन भागातील अनेक शेतकरी दुग्धव्यवसायाकडे वळाले आहेत. ग्रामीण भागातील शेतक-यांंच्या घरोघरी दुधाळ गाई व इतर जनावरांचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यातील शेतकरी नगदी पैसे देणारे पीक म्हणून व ऊस लागवडीकडे वळाले आहेत मुळे उदगीर तालुक्यात जवारीच्या कडव्याच्या पेंडीला सोन्याचे दिवस आले आहेत. उदगीर तालुक्यातील ऊस लागवडीत अग्रेसर असलेले बनशेळकी, हेर, करळखेल ,हळी , कुमठा, शेकापूर दावणगाव, देवर्जन ,करखेली, शंभू उमरगा, बावलगाव, बामणी या गावासह अनेक गावात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. तर काही भागांमध्ये पावसाचा खंड पडल्याने जनावरांना चारा नसल्याने कर्नाटक राज्यातून शेतकरी कडब्याचे दळणवळण करीत आहेत.

कडबा प्रती शेकडा पेंडी लहान मोठी पाहून अडीच हजार ते साडेतीन हजार रुपये प्रमाणे खरेदी करून घेऊन येत आहेत. ते साडेतीन हजार रुपये देऊनही मिळत नसल्याने उदगीरातील दुग्ध व्यवसायिक कडव्याच्या शोधात गावोगावी वणवाण फिरताना दिसून येत आहेत. कडबा मिळत नसल्याने अनेक शेतकरी उपलब्ध पाण्याच्या जोरावर लसून घास, गाजर गवताची लागवड करीत आहेत. गतवर्षीची सोयाबीन व तुरीची गोळी गोळीही जनावरांना चारा म्हणून देण्यात येत आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी नगदी पैशाच्या मागे लागल्याने ज्वारीची पेरणी कमी झाली असल्याने दूधउत्पादक शेतक-यांंची दमछाक होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR