35 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeलातूरनिवडणूक काळात तीन वेळा होणार खर्चाची तपासणी

निवडणूक काळात तीन वेळा होणार खर्चाची तपासणी

लातूर : प्रतिनिधी
निवडणूक आयोगाच्या निवडणूक खर्च संनियंत्रणविषयक निर्देशानुसार ४१-लातूर (अ. जा.) लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढविणा-या उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या नोंदवहीची तपासणी २७ एप्रिल निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांच्याकडून केली जाणार आहे. लातूर येथील नवीन शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात सकाळी ११ वाजता ही नोंदवही तपसणी होईल. तसेच निवडणूक काळात एकूण तीन वेळा नोंदवही तपासणी केली जाणार आहे.

उमेदवारांच्या खर्च नोंदवहीची पहिली तपासणी २७ एप्रिल रोजी, दुसरी तपासणी २ मे आणि तिसरी तपासणी ५ मे रोजी सकाळी ११ वाजता केली जाणार आहे. या तपासणीसाठी उमेदवारांनी स्वत: किंवा त्यांचा प्राधिकृत निवडणूक प्रतिनिधी यांनी खर्चाची नोंदवही, प्रमाणके, निवडणुकीसाठी खर्चाचे बँक पासबुकसह तपासणीसाठी उपस्थित रहावे, असे निवडणूक संनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी आप्पासाहेब चाटे यांनी कळविले आहे. उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवह्या तपासणी दरम्यान जनतेचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. तसेच कोणत्याही व्यक्त्तीस उमेदवाराच्या खर्चाच्या नोंदवहीची प्रत हवी असल्यास प्रत्येक प्रतीस १ रुपये इतकी रक्कम भरुन खर्चाच्या नोंदवहीची प्रत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडून प्राप्त करुन घेता येईल, असेही चाटे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR