35 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeसोलापूरमहापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाची सात रस्ता परिसरात कारवाई

महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाची सात रस्ता परिसरात कारवाई

सोलापूर : महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने सात रस्ता येथील स्टार हॉटेल आणि त्याशेजारील दोन खोकी हटवली. या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला. पोलिसांनी हस्तक्षेप करून कारवाई पूर्ण केली.

महापालिकेचे अतिक्रमण विभागप्रमुख जगन्नाथ बनसोडे म्हणाले, सात रस्ता येथील हॉटेलबाबत एका राजकीय कार्यकर्त्याकडून तक्रार आली होती. हे हॉटेल रस्त्यावर असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे होते. त्यानुसार आम्ही नगर अभियंता विभागाकडून अहवाल घेतला. या अहवालानुसार हॉटेलच्या पाडकामाची कारवाई झाली. या हॉटेलच्या बाजूला दोन बेकायदेशीर खोकी होती.

ही खोकी हटवण्यात आली आहेत. साहित्य जप्त केले आहे. यापुढील काळात सात रस्ता परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई होईल, असा इशाराही बनसोडे यांनी दिला.

सात रस्ता परिसरात फुटपाथवर अनेकांनी दुकाने, खोकी टाकली आहेत.पालिकेच्या ई टॉयलेटच्या बाजूलाच बेकायदेशीर दुकान थाटले आहे.
पालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागातील कर्मचाऱ्यांनी या अतिक्रमणांना सहकार्य केल्याचा आरोप या भागातील नगरसेवक करीत असतात. अतिक्रमणविभागाने केवळ एका हॉटेलवर का कारवाई केली. इतरांवर कारवाई का केली नाही, असे येथील व्यावसायिक विचारत होते. मात्र, अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR