38.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeधाराशिवधाराशिव येथे पत्रकार रवींद्र केसकर हल्ला प्रकरणी दोघांना अटक

धाराशिव येथे पत्रकार रवींद्र केसकर हल्ला प्रकरणी दोघांना अटक

धाराशिव : प्रतिनिधी
शहरातील पत्रकार रवींद्र केसकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करणा-या दोघांना पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने दि. ८ एप्रिल रोजी अटक केली आहे. पत्रकार केसकर यांच्यावर दि. १ एप्रिल रोजी धाराशिव मधील बेंबळी रोडवर सिध्देश्वर बेकरीच्या पुढे अनोळखी मारेक-यांनी जीवघेणा हल्ला केला होता. हल्लेखोरांनी त्यांची दुचाकी आडवून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डाव्या गालावर कोयत्याने वार करुन जखमी केले होते. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले होते. या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे अज्ञात मारेक-यांवर कलम ३०७ सह विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचे गांर्भीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, विशेष पथकाचे सपोनि अमोल मोरे, सपोनि सचिन खटके, शिराढोण ठाण्याचे सपोनि कल्याण नेहरकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ विनोद जानरव, पोहेकॉ अमोल निंबाळकर, पोहेकॉ समाधान वाघमारे, पोहेकॉ हुसेन सय्यद, जावेद काझी, पोना बबन जाधवर, पोना नितीन जाधवर, पोकॉ रविंद्र अरसेवाड, पोकॉ योगेश कोळी, चालक पोहेकॉ महेबुब अरब, विजय घुगे, पोकॉ सुनिल मोरे यांचे पथकाने तांत्रीक विश्लेषण करून व सीसीटीव्ही कॅमे-याच्या आधारे गुन्ह्यातील आरोपींना निष्पन्न केले.

आरोपी दत्तात्रय भरत नरसिंगे रा. तांदुळजा ता. जि. लातूर यास गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह तांदुळजा येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या संदर्भात कौशल्यपुर्ण रितीने सखोल चौकशी केली. त्यांने सदरचा गुन्हा इतर दोन साथीदारासह तेला असल्याचे सांगितले. या गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार सेवेतून बडतर्फ पोलीस उपनिरिक्षक प्रेमकुमार सुखदेव बनसोडे रा. शाहुनगर धाराशिव हा असून त्याच्या नियेजनानुसार पत्रकारावर हल्ला केला असल्याचे सांगितले. प्रेमकुमार बनसोडे याला शिराढोण पोलीस ठाणे यांच्या मदतीने शोध घेवून जायफळ गावातुन ताब्यात घेतले. गुन्ह्यासंदर्भात बनसोडे यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांने हा गुन्हा त्याच्या साथीदारासह केल्याची कबुली दिली आहे.

ही कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, विनोद जानरव, पोहेकॉ अमोल निंबाळकर, पोहेकॉ समाधान वाघमारे, पोहेकॉ हुसेन सय्यद, जावेद काझी, पोना बबन जाधवर, पोना नितीन जाधवर, पोकॉ रविंद्र अरसेवाड, पोकॉ योगेश कोळी, चालक पोहेकॉ महेबुब अरब, विजय घुगे, पोकॉ सुनिल मोरे, अशोक कदम यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR