31.7 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeनांदेडविमानतळावर शिवसेना कार्यकर्ते व पोलिसांत बाचाबाची

विमानतळावर शिवसेना कार्यकर्ते व पोलिसांत बाचाबाची

नांदेड : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नांदेड विमानतळावर सोमवारी सकाळी आगमन झाले. यावेळी शिवसेना कार्यकर्ते व पोलिस कर्मचा-यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सोमवारी नियोजित हिंगोली दौरा होता.

विमानाने ते सकाळी श्री गुरूगोविंदसिंघजी विमानतळावर दाखल झाले. तेव्हा ठाकरे यांच्या स्वागतासाठी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी गदी झाली होती. यावेळी विमानतळाच्या प्रवेशव्दारावर कार्यकर्ते व बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचा-यांत चांगलीच बाचाबाची झाली. यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर उद्धव ठाकरे हिंगोलीकडे रवाना झाले. दरम्यान सुरक्षतेच्या कारणाहून ही बाचाबाची झाल्याचे समझते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR