34 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeधाराशिवधाराशिव, उमरगा येथे शस्त्र घेऊन फिरणा-यावर गुन्हे दाखल

धाराशिव, उमरगा येथे शस्त्र घेऊन फिरणा-यावर गुन्हे दाखल

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव शहरात रामनवमी निमित्त काढलेल्या मिरवणुकीत एकजण फिरत होता. तर उमरगा येथे एकजण तलवार घेऊन आरडाओरडा करीत फिरत होता. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दि. १८ रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनवमी निमित्त धाराशिव शहरात दि. १७ रोजी सायंकाळी मिरवणूक निघाली होती. त्यावेळी आनंदनगर पोलीस रस्त्यावर पेट्रोलिंग करत होते. यावेळी आर पी कॉलेज धाराशिव येथे माणिक चौक येथील दर्शन अरुण चव्हाण हा लोकांचे जिवीत धोक्यात येईल, असे विना परवाना एक लोखंडी कत्ती बेकायदेशीररीत्या हातात घेऊन मिरवणुकीत फिरत असताना पोलीसांना आढळला. त्यांने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. पथकाने आरोपी दर्शन चव्हाण यास ताब्यात घेऊन त्याच्या जवळील ती कत्ती जप्त केली. या प्रकरणी पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन शस्त्र कायदा कलम- ४, २५, मुंबई पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा पोलीस ठाण्याचे पथक दि.१८ रोजी सकाळी उमरगा येथे रस्त्यावर पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी बसस्थानक उमरगा येथील फ्रेन्डस ज्युस सेंटर समोर गौतमनगर, उमरगा येथील नवीन रमेश दर्वेश हा लोकांचे जिवीत धोक्यात येईल, अशी तलवार घेऊन आरडा ओरड करत फिरत असताना पथकास आढळला. यावेळी पथकाने आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्या जवळील ती तलवार जप्त केली. या प्रकरणी पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR