38.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeधाराशिववंचितच्या उमेदवारीवरुन मविआ-महायुतीमध्ये चुरस?

वंचितच्या उमेदवारीवरुन मविआ-महायुतीमध्ये चुरस?

धाराशिव लोकसभेसाठी आंधळकर रिंगणात

भूम : प्रतिनिधी
धाराशिव लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीकडून भाऊसाहेब आंधळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे या मतदार संघात महायुतीला व महाविकास आघाडीमध्ये चुरस वाढली आहे. यामध्ये आंधळकर हे कोणाची मते खेचून घेणार कोणाला धोबीपछाड करणार की दोन्ही वादात बाजी मारणार हे येणा-या काळात मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे निकटवर्ती असणारे भाऊसाहेब आंधळकर यांना वंचित आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.

त्यामुळे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात विविध चर्चेला उधाण आले आहे. वंचित आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार हा तुल्यबळच असणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी उमेदवार दिला असून हा उमेदवार महायुती की महाविकास आघाडी यापैकी कोणाची धडकी बसवणार हे येणा-या काळात लक्षात येईल, भाऊसाहेब आंधळकर हे गृहखात्यातील व्यक्ती आहेत.

बार्शी तालुक्यात त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यामुळे बार्शी तालुक्यात लोकांशी संपर्क आहे. सुरवातीला त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून आपले राजकीय अस्तित्व निर्माण केले होत. त्यानंतर शिवसेनेचे दोन गट निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले होते.त्यांची ओळख शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून बार्शी तालुक्यात परिचित आहेत. दुसरी बाजू भाऊसाहेब आंधळकर हे लिंगायत समाजाचे नेते आहेत.

बार्शी, लोहारा, उमरगा, औसा या चार तालुक्यासह इतर तालुक्यातील मतदार संघात लिंगायत समाजाचा चांगलाच प्रभाव आहे. त्यासोबतच त्यांना आता वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची साथ मिळणार आहे. त्यामुळे भाऊसाहेब आंधळकर हे विजय खेचून आणणार की महायुतीला की महाविकास आघाडीच्या उमेदवारला दणका देणार हे मात्र निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे. वंचितकडून भाऊसाहेब आंधळकर यांच्या उमेदवारीवरून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR