मुख्य बातमी

राज्यात ६२ टक्के मतदान

18-04-2014 12:57:45 AM

मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद Ÿ। दिग्गजांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद

मुंबई : राज्यात गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातील मतदानाला मतदारांनी उत्साहाने प्रतिसाद दिला आहे. सायंकाळपर्यंत महाराष्ट्रातील १९ मतदारसंघांत सरासरी ६२ टक्के मतदान झाले. किरकोळ प्रकार वगळता गुरुवारी मतदान शांततेत पार पडले. राज्यातील एकूण ३५८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. उस्मानाबाद आणि लातूरमध्ये दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान पाऊस पडल्याने काही प्रमाणात मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता; परंतु पाऊस थांबल्याने पुन्हा मतदानाचा वेग वाढला.
महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र...

देश-विदेश

गॅब्रिएलच्या जाण्याने हळहळ !

18-04-2014 08:55:16 PM

· साहित्यविश्वाने वाहिली श्रद्धांजली · शब्दयात्रीचा अंतिम प्रवास

वृत्तसंस्था
न्यूयॉर्क : ‘वन हंडड्ढेड इयर्स ऑफ सॉलिट्युड’ या आपल्या कादंबरीने जगभरामधील आदरणीय लेखकांच्या प्रभावळीत स्थान मिळविणा-या गॅब्रिएल गार्सिया माक्र्वेझ यांचे मेक्सिकोेमधील त्यांच्या घरी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. रँडम हाऊसमधील त्यांचे माजी प्रकाशक ख्रिस्तोबल पेरा यांनी माक्र्वेझ यांच्या निधनासंदर्भातील माहिती दिली. कोलंबियन लेखक असलेल्या माक्र्वेझ यांना १९८२ मध्ये साहित्यासाठीच्या नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले होते. दक्षिण (लॅटिन) अमेरिकेतील काल्पनिक पौराणिक संकल्पनेवर आधारलेल्या या कादंबरीने जगभरातील वाचकांना भुरळ घातली होती. या विसाव्या शतकामधील...

Sports

बंगळूर विजयी

18-04-2014 12:49:11 AM

· विराट-युवीची चमकदार कामगिरी, · दिल्ली डेअरडेव्हिल्सला पराभवाचा दणका

वृत्तसंस्था
शारजाह : कर्णधार विराट कोहली (४९) आणि युवराजसिंग (५२) या जोडीने शानदार कामगिरी करीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला सहज विजय मिळवून दिला. दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध तब्बल ८ गडी राखून मात करीत त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.
आयपीएलच्या सातव्या हंगामातील दुस-या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली डेअरडेव्हिल्सने निर्धारित २० षटकांत १४५ धावा केल्या होत्या. त्यानंतर १४६ धावांचे आव्हान स्वीकारून मैदानात उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्सने १६.४ षटकांतच लक्ष्य पार करून शानदार विजय मिळविला. या विजयात युवराजसिंग आणि कर्णधार विराट...

महाराष्ट्र

शरद पवारांवर हल्लाबोल

18-04-2014 09:18:31 PM

पवारांच्या ‘अर्धी चड्डी’ वर उद्धव ठाकरेंची टीका
वृत्तसंस्था
मुंबई : देशाला भरजरी वस्त्रात सजवायचे असेल, जनतेच्या अंगावर वस्त्र हवे असेतील तर देशात अर्धी चड्डीवाल्यांचेच राज्य आणावे लागेल. हाफ चड्डीवाल्यांना अयोध्येत राम हवा आहे तर फुल चड्डीवाल्यांना पुन्हा बाबराचे आक्रमण हवे आहे, अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. शरद पवारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लेंग्याची सुटलेली नाडी सांभाळावी, असाही शाब्दिक हल्ला त्यांनी केला आहे.
शरद पवारांनी दोन दिवसांपूर्वी कल्याण-ठाण्यातील एका सार्वजनिक सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपवर टीका करताना असल्या अध्र्या...

Photo Gallery

👍 आपला अभिप्राय/प्रतिक्रिया

E-Paper

संपादकीय

मतदार जागा झाला

नेहमीप्रमाणे निवडणुका यायच्या आणि जायच्या; परंतु काही मतदारांसाठी त्याचे काहीच महत्त्व नसायचे. म्हणजे हा मतदार मतदान केंद्राकडे फिरकायचाच नाही. मतदाना दिवशी मिळणारी सुटी तो मौजमजा करण्यात घालवायचा. राज्यात कुणाची सत्ता आली, केंद्रात कोण खुर्चीवर बसले त्याचे त्याला काहीच सोयरसुतक नसायचे. बरे, हा माणूस अशिक्षित म्हणावा तर चांगले सुशिक्षित, प्रतिष्ठित अशी चंदेरी दुनियेतील चमचमाती माणसेसुद्धा मतदानासाठी फिरकायची नाहीत. लोकशाहीच्या मोठमोठ्या गप्पा मारायच्या पण मतदानासारखे पवित्र कार्य...

Poll

मनोरंजन

मराठी तारकांचा शतकमहोत्सवी सोहळा

साता समुद्रापार झेंडा फडकावणा-या आगळ्या-वेगळ्या मराठी तारका या कार्यक्रमाचा शतकमहोत्सवी सोहळा नुकताच रोडी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दिमाखात पार पडला. चिरतरुण आवाजाच्या आशाताई भोसले आणि चिरतारुण्याचे वरदान लाभलेल्या रेखा, तसेच नृत्यगुरू पद्मविभूषण पं. बिरजू महाराज, ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान, आशा पारेख आणि लेखिका शोभा डे यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून...

वाचा सप्तरंगमध्ये

विद्यार्थी वाहतूक समस्यांच्या भोव-यात

पुण्यातील स्प्रिंगडेल शाळेतील एका विद्यार्थिनीवर बसचालकाने केलेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे विद्याथ्र्यांची वाहतूक हा विषय चर्चिला जात आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार घरापासून १ किलोमीटर अंतरावरच्या शाळेत पाल्याला घालावे,अशी अपेक्षा व्यक्त केलेली असतानाही पालक ती मानायला तयार नसल्याने शहरांमध्ये विद्याथ्र्यांची वाहतूक अपरिहार्य बनली...